Coronavirus | एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद; लॉकडाऊनच्या पुढिल आदेशानंतर घेणार निर्णय
एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली असून त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली असून त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे काय निर्णय घेण्यात येईल याकडे आमचं लक्ष आहे.'
काही दिवसांपूर्वी सिव्हिल एव्हिएशनकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यावेळी सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितले होते की, 'विमान कंपन्या 14 एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. 25 मार्च रोजी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो 14 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा वाढती प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे.
पाहा व्हिडीओ : कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेल्सचे दरवाजे खुले
भारतावर कोरोनाचं सावट
भारतात कोरोना फोफावत असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. आज कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, देशभरात 3052 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दिल्लीतील तब्लिगींमुळे देशात कोरोना रूग्णांचा आकडा वाढला
कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्वांसाठी तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेले लोक चिंतेचा विषय ठरत आहेत. तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेक लोकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न होत असून त्यामुळे देशातील कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये एकूण 3000 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये 647 लोक मरकजमध्ये सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या :
#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅप
Coronavirus | कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेची भारताला 7500 कोटींची मदत