एक्स्प्लोर
देशात कोरोना बाधितांचा आकडा 43 हजारांंजवळ, आतापर्यंत 1389 मृत्यू
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन झालं नाही तर, कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

ऩवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन 3मध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 42 हजार 533 वर पोहोचली आहे. सोमवारपर्यंत देशात 1 हजार 398 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 83 जणांचा मृत्यू झाला असून कोरोना रुग्णांच्या संख्येत 2 हजार 573 ने वाढ झाली आहे.
देशात कोरोनाचे सध्या 29 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहितीनुसार आतापर्यंत 11हजार 761 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के इतकी आहे.
कोरोना व्हायरस सारखे साथीचे आजार क्वचितच आढळून येतात. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन झालं नाही तर, कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
TOP 50 | गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक
कोरोनाच्या कोणत्या राज्यात किती केसेस?
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 12 हजार 974 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 548 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात 1650, अंदमान-निकोबारमध्ये 33, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 43, बिहारमध्ये 517, चंदिगडमध्ये 94, छत्तीसगडमध्ये, 57, दिल्लीत 4549 आणि गोव्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, आता गोव्यातील 7 रुग्ण समोर आले आहेत.
याशिवाय गुजरातमध्ये 5428, हरियाणामध्ये 442, हिमाचल प्रदेशात 40, जम्मू-काश्मीरमध्ये 701, झारखंडमध्ये 115, कर्नाटकात 642, केरळमध्ये 500, जम्मू कश्मीर 701, लडाखमध्ये 41, मध्य प्रदेशात 2,942, मणिपूरमध्ये 2, मेघालयामध्ये 12, मिझोरममधील 1, ओडिशामध्ये 163, पाँडेचरीमध्ये 8, पंजाबमध्ये 1102, राजस्थानमध्ये 2886, तामिळनाडूमध्ये 3023, तेलंगणामध्ये 1082, त्रिपुरामध्ये 16, उत्तराखंडमध्ये 60, उत्तर प्रदेशात 2742 आणि पश्चिम बंगालमध्ये 963 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
