Coronavirus: आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोविड स्थितीबाबत आज आढावा बैठक
Coronavirus: आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील कोविड-19 ची सद्यस्थिती आणि ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल.
Coronavirus In India: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) आज आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड-19 च्या (Covid-19) सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेणार आहेत. ही आढावा बैठक शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केली जाईल. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील कोविड-19 ची सद्यस्थिती आणि ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortia (INSACOG) नं सांगितलंय की, ओमिक्रॉन देशातील समुदाय प्रसाराच्या पातळीवर आहे.
मनसुख मांडविया यांनी गेल्या मंगळवारी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि चंदीगड यांचा समावेश होता. या बैठकीत राज्यातील कोविड व्यवस्थापन, दैनंदिन रुग्णांची संख्या आणि लसीकरणाची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. या 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
राज्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा वेग वाढवावा
मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्या जलद करण्याची आवश्यकता आहे. ज्या राज्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा वेग वाढवावा, अशीही विनंती मनखुस मांडविया यांनी केली.
ओमायक्रॉनमुळं देशातील रुग्णसंख्येत वाढ
देशात ओमायक्रॉन सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविडशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवलीय. याचबरोबर केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करण्यास सांगितलंय. कोरोनाचे नवीन प्रकार, ओमायक्रॉन प्रकारामुळं देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय, असं गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे देखील वाचा-
- Covid Vaccination: 1 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना लस घेता येणार
- Coronavirus Cases Today : कोरोनाचा विळखा सैल, देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण
- Covid Guidelines : केंद्र सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha