![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : कोरोनाचा विळखा सैल, देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 2 लाख 51 हजार 209 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 627 लोकांचा मृत्यू झाला आहे.
![Coronavirus Cases Today : कोरोनाचा विळखा सैल, देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण coronavirus cases in india today 251209 new cases and 627 deaths recorded in the last 24 hour Coronavirus Cases Today : कोरोनाचा विळखा सैल, देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/3cbd596f83f177a2ee275ba8442b1872_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा (Coronavirus) विळखा सैल होताना पाहायला मिळतोय. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 2 लाख 51 हजार 209 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 627 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता (Corona Positivity Rate) दर आता 15.88 टक्क्यांवर आला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
देशात 21 लाख 5 हजार 611 सक्रिय कोरोनाबाधित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 5 हजार 611 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 92 हजार 327 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तीन लाख 47 हजार 443 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 80 लाख 24 हजार 771 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 164 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 164 कोटीहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 57 लाख 35 हजार 692 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 164 कोटी 44 लाख 73 हजार 216 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid Guidelines : केंद्र सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- Omicron : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
- Viral New : सुरुंगाचा शोध घेणाऱ्या मागवा उंदराचा मृत्यू, हजारोंचे प्राण वाचवल्याबद्दल मिळालं होतं सुवर्ण पदक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)