एक्स्प्लोर

Corona Cases : देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 50 टक्के रुग्ण फक्त केरळमधील

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 42,625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 562 कोरोना रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 562 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहेय केरळमध्ये काल सर्वाधिक 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

केरळमध्ये पुन्हा 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद 

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34.49 लाख झाली आहे. केरळमध्ये सलग सहाव्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

देशातील कोरोनाची स्थिती 

कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 17 लाख 69 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 9 लाख 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 10 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात काल (मंगळवार) 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल (मंगळवार) 6005 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 

राज्यात काल (मंगळवार) कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 PM टॉप 25 न्यूज : 26 April 2024 : ABP MajhaDhananjay Munde : पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी, धनंजय मुंडेंचा सवालJitendra Awhad : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम : जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमंक कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Embed widget