(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : कोरोनाचा आलेख पुन्हा वाढताच, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 86 हजार रुग्णांची नोंद
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 85 हजार 914 नवीन रुग्ण आढळले असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज देशात 11.7 टक्के जास्त प्रकरणे समोर आली आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशात (India) प्राणघातक कोरोना विषाणू(Coronavirus) च्या साथीच्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 85 हजार 914 नवीन रुग्ण आढळले असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर (Corona Positivity Rate) आता 16.16 टक्के इतका झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे कालच्या तुलनेत आज देशात 11.7 टक्के जास्त प्रकरणे समोर आली आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 22 लाख 23 हजार 18
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 23 हजार 18 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 91 हजार 127 झाली आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात दोन लाख 99 हजार 73 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 73 लाख 70 हजार 971 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 163 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 163 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 59 लाख 50 हजार 731 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 163 कोटी 58 लाख 44 हजार 536 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day 2022 : 73 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! कार्यक्रमाची रुपरेषा जाणून घ्या...
- President Kovind Speech: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी केलं देशाला संबोधित
- Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha