Coronavirus Cases India : देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3324 नवे कोरोनाबाधित
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3324 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3688 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
Over 60% of youngsters between the 12-14 age group have received the 1st dose of #COVID19 vaccine. https://t.co/cTqHSj7LVg
— PIB India (@PIB_India) May 1, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Price : खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर माहित आहेत का? जाणून घ्या...
- PM Modi : पंतप्रधान मोदी 2 मेपासून विदेश दौऱ्यावर, तीन देशांना देणार भेट, 25 कार्यक्रमांमध्ये सहभाग
- SECR Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज, वाचा सविस्तर
- Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम