Coronavirus : कोरोनाचा आलेख घसरतोय! देशात 4777 नवीन कोरोना रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. देशात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांची संख्या घडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याआधी 24 सप्टेंबरला देशात 4 हजार 912 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 81 रुग्णांनी कमी झाली आहे.
कोरोनाचा आलेख घटतोय
देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशात सध्या 43 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी शुक्रवारी ही संख्या 44 हजारांवर होती. तर त्याआधी गुरुवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 45 हजारांवर होती. सध्या देशात 43 हजार 994 सक्रिय रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 28 हजार 510 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
#COVID19 | India reports 4,777 fresh cases and 5,196 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 25, 2022
Active cases 43,994
Daily positivity rate 1.58% pic.twitter.com/5PTdmqZ1Ux
राज्यात शनिवारी 619 रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Update)
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 686 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 25, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/VjN4KvAkdS pic.twitter.com/QBDrVmd7j5
दिवसभरात 5 हजार 196 रुग्ण कोरोनातून बरे
आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 196 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के इतके असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट 1.58 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 5 लाख 28 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या