Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 619 रुग्णांची नोंद तर 686 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra corona cases : राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात 686 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update)
राज्यात शनिवारी 619 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 686 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,66,768 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.13 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 3,709 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 3,709 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 752 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 457 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात चार हजारहून अधिक नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारांच्या पुढे होती. आदल्या दिवशी देशात 5 हजार 383 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेनं 441 रुग्ण घटले आहेत. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग आहे. कोरोना संसर्गाचा आलेख जरी घसरताना दिसत असला तरी कोरोनाबींची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल हा आकडा 20 वर होता. तर देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 487 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या