Corona Update : देशात 20,408 नवीन कोरोना रुग्ण, 47 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात 20 हजार 408 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती जाणून घ्या.
Coronavirus Cases Today in India : देशात एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूही डोकं वर काढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 408 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 20 हजार 409 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 32 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात 20 हजार 958 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर
देशात वाढता संसर्ग पाहता दिलासासादायक बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 958 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 33 लाख 30 हजार 442 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 1 लाख 43 हजार 384 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्के आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी 1997 कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1997 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात एकूण 2470 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
महाराष्ट्रात BA.5 चे चार रुग्ण आणि BA.2.75 चे 32 रुग्ण
महाराष्ट्रात बीए.5 उपप्रकाराचे चार रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए. 2.75 व्हेरीयंटचे देखील 32 रुग्ण आढळले आहेत. यातील 23 रुग्ण नागपूर येथील, 11 यवतमाळ, आणि दोन वाशिम येथील आहेत. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 196 तर बीए. 2.75 रुग्णांची संख्या 120 झाली आहे
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 30, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/Uc2QhzlX9A pic.twitter.com/iBAGr51aSZ