(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Update | देशात आतापर्यंत 2.80 कोटी लोकांनी घेतली कोरोना लस
देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून शुक्रवार पर्यंत 2.80 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : शुक्रवारी एकाच दिवशी देशात कोरोनाच्या लसीचे 18.40 लाख डोस देण्यात आलेल असून आतापर्यंत एकूण 2.80 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत दोन कोटी 80 लाख पाच हजार 817 इतक्या लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 72,84,406 इतके आरोग्य कर्मचारी 72,15,815 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच 41,76,446 आरोग्य कर्मचारी आणि 9,28,751 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त 71,69,695 ज्येष्ठ नागरिकांना तर 45 वर्षापरील गंभीर आजार असलेल्या 12,30,704 इतक्या लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा 56 वा दिवस होता.
देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.40 इतका आहे तर रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर हा 1.68 आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात 11 वा क्रमांक आहे.
देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना वॅक्सीन देण्यात आले आहे.
कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.
लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, आज 15 हजार 817 रुग्णांची नोंद