तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला
Sonia Gandhi Voter Row : सोनिया गांधींच्या मतपत्रिकेबद्दल दावा करताना भाजपने फोटोशॉप केले, त्यात एक चूक सोडल्याचं काँग्रेसने म्हटलं. नरेंद्र मोदींकडून योग्य माहिती घ्यावी असा टोलाही काँग्रेसने लगावला.

नवी दिल्ली : भाजपने सोनिया गांधी यांचे निवडणूक दस्तऐवज (Sonia Gandhi Voter Row) चुकीचं असल्याचा दावा केल्यानंतर आता काँग्रेसने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या अमित मालवीय (Amit Malviy Post) यांनी शेअर केलेले दस्तऐवज हे बोगस असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. भाजपने जे 1980 सालचे खोटं पत्र दाखवलं आहे त्यावर नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (National Capital Territory of Delhi NCT) असं लिहिलं आहे. पण त्यावेळी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अस्तित्वातच नव्हती, ती 1991 च्या कायद्याने 1992 साली अस्तित्वात आली. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आल्याचं काँग्रेसने म्हटलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा आरोप केला होता. त्यावर त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या कागदपत्रांचा संदर्भ दिला. त्यानंतर भाजपकडून काँग्रेसवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले. काँग्रेसला निवडणुकींमध्ये बनवाबनवी करण्याचा इतिहास असल्याचा दावा भाजपने केला.
सोनिया गांधींबद्दल भाजपचा दावा काय?
भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक पोस्ट शेअर केली. सन 1980 साली सोनिया गांधी या इटलीच्या नागरिक होत्या, भारतीय नागरिक नव्हत्या. तरीही 1980 सालच्या दिल्लीतील मतदारयादीत त्यांचे नाव होते असा दावा अमित मालवीय यांनी केला होता. त्यावर काँग्रेसने त्यांचा दावा खोडून काढला.
भाजपचे कागदपत्र खोटे, त्यावेळी NCT अस्तित्वात नव्हती- काँग्रेस
काँग्रेसच्या केरळ युनिटने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "तुमचं फोटोशॉप खूप चांगलं आहे, फक्त एक चूक सोडली आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (NCT) ही 1991 च्या 69व्या घटनादुरुस्ती कायद्याने अस्तित्वात आली. 1980 मध्ये ती युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली होती. तुमच्या पॉपॉ नरेंद्र मोदींना योग्य माहिती द्यायला सांगा."
Dey Fraud,
— Congress Kerala (@INCKerala) August 14, 2025
Your photoshop is really good, except for one mistake. The National Capital Territory of Delhi (NCT) was constituted by the 69th Constitutional Amendment Act of 1991. It was Union Territory of Delhi in 1980.
Ask your paw paw nrndrmdi to give a better idea. https://t.co/ojVUNE3h1l
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी यावरुन भाजपच्या अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "भाजपच IT सेल एक बनावट दस्तऐवज पोस्ट करत आहे. ‘नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली’ ही 2 जानेवारी 1992 रोजी अस्तित्वात आली. पण या मालवियांनी शेअर केलेला दस्तऐवज 1980 चा असल्याचा दावा आहे. त्यावेळी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अस्तित्वातच नव्हती.”
टीएमसी खासदार साकेत गोखलेंनी पुढे म्हटलंय की, "बनावट दस्तऐवज तयार करणे हा गुन्हा आहे आणि BNS कलम 336(3) अंतर्गत त्याला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. मतदान-चोर निवडणूक आयोगाकडे भाजपच्या IT सेल प्रमुखाविरुद्ध FIR दाखल करण्याची हिंमत आहे का?"
BJP’s IT cell coolie has posted a FORGED document.
— Saket Gokhale MP (@SaketGokhale) August 14, 2025
“National Capital Territory of Delhi” was created on 2nd Jan, 1992. The document shared by this man is supposedly dated from the year 1980 when “NCT of Delhi” didn’t exist.
Forgery is a crime punishable with 7 years… https://t.co/OaFMmLk5sI
ही बातमी वाचा:























