एक्स्प्लोर
नोटाबंदीविरोधात काँग्रेसचा एल्गार, अहमदाबादमध्ये सुशीलकुमार शिंदे ताब्यात
मुंबई: नोटाबंदीविरोधात काँग्रेसनं आज देशव्यापी आंदोलन केलं. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध केला. आरबीआयच्या वेगवेगळ्या शाखांसमोर काँगेसच्या कार्यकर्त्यांनी धरणं आदोलनं केलं.
'अहमदाबादमध्ये सुशीलकुमार शिंदे पोलिसांच्या ताब्यात '
दरम्यान, अहमदाबादमध्ये नोटाबंदीविरोधात आंदोलन करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह शंकरसिंह वाघेला आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार
दुसरीकडे नागपूरमध्ये नोटबंदीविरोधात आंदोलन कणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आरबीआयच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला होता.
मुंबईतही काँग्रेसचं घेराव आंदोलन
नोटबंदीचा विरोध करण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये काँग्रेसनं घेराव आंदोलन केलं. नागपुरातल्या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
23 जानेवारीपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरु राहणार
नोटाबंदीच्या निर्णयाला 70 दिवस पूर्ण झाल्यानंतरही चलन तुटवडा सुरुच आहे असा दावा काँग्रेसकडून करण्यात येतो आहे. त्यामुळेच आज हे आंदोलन छेडण्यात आलं. दरम्यान, 23 जानेवारीपर्यंत काँग्रेस हे आंदोलन देशभर सुरु ठेवणार आहे. याआधी 28 नोव्हेंबरला देखील काँग्रेसनं नोटाबंदीविरोधात आंदोलन पुकारलं होतं.
संबंधित बातम्या:
RBI मध्ये घुसणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement