आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं : राहुल गांधी
देशात काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी चीनची भारतात घुसखोरी करण्याची हिंमत नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश कमकुवत केला आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कुरुक्षेत्र : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींनी हरियाणामध्ये बोलताना म्हटलं की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, मात्र संपूर्ण देशाला माहिती आहे की चीनचं सैन्य भारतात शिरलं आहे. मग हे असे कसले देशभक्त आहेत? मी सांगतो की आमचं (काँग्रेस) सरकार असतं तर चीनला देशाबाहेर काढायला 15 मिनिटही लागले नसते. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला 100 किमी दूर केलं असतं.
जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, आपल्या देशात पाऊल टाकण्याइतकी चीनची हिंमत नव्हती. आज संपूर्ण जगात एकच देश आहे ज्या देशामध्ये दुसर्या देशाच्या फौजेने घुसखोरी केली आहे आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की या देशाची जमीन कोणी घेतली नाही, असा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केला.
भारत-चीन तणाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंगपींग 17 नोव्हेंबरला समोरासमोर येणार
कोरोनाच्या वेळी भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात घुसखोरी करण्यासाठी चीनमध्ये इतकी हिम्मत कुठून आली हे मी तुम्हाला सांगतो. नरेंद्र मोदींनी देश कमकुवत केल्याचं त्यांना माहित आहे. कोरोनाच्या वेळी भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले आहेत. देशातील शेतकरी व मजूर कमकुवत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची शक्ती ओळखत नाहीत. शेतकऱ्यांची शक्ती नाही ओळखत, कामगारांची शक्ती नाही ओळखत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
