एक्स्प्लोर
महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री प्रयागराजला, कुंभमेळ्यात पवित्र स्नान
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराला नमन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजला गेले होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यात जाऊन पवित्रस्नान केलं.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजला गेले होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यात जाऊन पवित्रस्नान केलं. पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रही यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
महाकुंभात स्नान केल्यानंतर फडणवीसांनी 'हर हर महादेव'चा जयघोष केला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराला नमन करण्यासाठी मुख्यमंत्री कुंभमेळ्याला गेले होते. यावेळी रावल आणि मिश्र यांनीही कुंभात स्नान केलं.
मुख्यमंत्र्यांच्या स्नानावेळी उत्साहित झालेल्या भक्तांनी 'वंदे मातरम्' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या. हा विशाल कुंभमेळा भव्य-दिव्य, स्वच्छ आणि पावित्र्याने आयोजित केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रसेच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कुंभमेळ्याच्या निमित्तानं गंगा स्नान केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement