CISCE Exam: दहावीच्या पेपरच्या तारखा बदलल्या; गणित, भूगोल आणि हे पेपर आता 'या' तारखांना होणार
CISCE Exam: नवीन वेळापत्रकानुसार, गणित आणि भूगोलच्या पेपरची तारीख बदलली असून नव्या तारखेनुसार ते अनुक्रमे 2 मे आणि 4 मे रोजी होणार आहेत.
नवी दिल्ली: कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) दहावीच्या दुसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. या नव्या वेळापत्रकानुसार, गणित आणि भूगोलच्या पेपरची तारीख बदलली असून ती अनुक्रमे 2 मे आणि 4 मे रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी हे दोन पेपर हे 3 मे आणि 5 मे रोजी घेण्यात येणार होते. CISCE चे नवीन वेळापत्रक हे cisce.org या अधिकृत साईटवर पहायला मिळेल.
कोणत्या पेपर्सची तारीख बदलली?
नवीन वेळापत्रकानुसार, गणिताचा पेपर हा 2 मे, भूगोलचा पेपर हा 4 मे, फिजिक्सचा पेपर 9 मे तर बायोलॉजीचा पेपर हा 17 मे रोजी घेण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या 25 एप्रिल ते 6 जून या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीचे पेपर हे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत तर बारावीचे पेपर हे दुपारी 2 ते 3.30 या वेळेत होणार आहेत.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डने हे नवीन वेळापत्रक आज जाहीर केल आहे. पण या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल का करण्यात आला आहे याचे कारण मात्र त्यांनी दिलं नाही.
बारावीच्या परीक्षांमध्ये बदल नाही
दरम्यान बारावीच्या पेपरच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या:
- JEE mains 2022 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिलपासून सुरू होणार परीक्षा, असा करा अर्ज
- MHADA Exam : म्हाडा भरती परीक्षेत घोळ घालणारी 'ही' कंपनी काळ्या यादीत, गृहनिर्माण विभागाचा निर्णय
- HSC Exam : जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांची कोरोनानंतरची 'परीक्षा'! आज पहिला सामना इंग्रजीशी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha