JEE mains 2022 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिलपासून सुरू होणार परीक्षा, असा करा अर्ज
JEE Mains 2022 : जॉइन्ट एंट्रन्स एग्जामिनेशन (JEE) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
JEE Mains 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) जॉइन्ट एंट्रन्स एग्जामिनेशन (JEE) चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परिक्षेचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेईई मेन्स सत्र हे 16, 17, 18, 19, 20 आणि 21 एप्रिल रोजी होणार आहे. सत्र दोनचे आयोजन 24, 25, 26, 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहे. एनटीएनं हे आधीच सांगितलं आहे की, या वर्षी जेईई मेन्स ही चार ऐवजी दोन वेळा होणार आहे. जेईई मेन्सच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर विद्यार्थ्यी परीक्षेचे नियम पाहू शकतात.
जॉइन्ट एंट्रेंस एग्जामिनेशन मेन्समध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर हा पदवीपूर्व अभियांत्रिकी प्रोग्रॅममध्ये (B.E/B. Tech) प्रवेश घेणाऱ्यांसाठी आयोजित केला जातो. या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये विषय आणि परीक्षेची तारीख लिहिलेली आहे.
JEE Main 2022: असा करा अर्ज
1. सर्व प्रथम मोबाईल किंवा लॅपटॉपवर jeemain.nta.nic.in ही वेबसाइट ओपन करा.
2.JEE Main application form या ऑप्शनवर क्लिक करा.
3. तिथे लिहिलेली माहिती भरा.
4. अॅप्लिकेशन फॉर्म भरा
5. ऑनलाइन पद्धतीनं फी भरा. (फी भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे)
6. फॉर्म सबमिट करा.
7. फॉर्मची प्रिंट काढून ती स्वत:कडे ठेवा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai School Reopen : मुंबईत आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरू; कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं निर्णय
- Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांक, देशात दर काय?
- Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाची झळ विदर्भातील व्यापार उद्योगांना; कोट्यवधी रुपये अडकले
- Russia-Ukraine War : किव्ह संकटात, उपग्रहानं टिपला 'पुरावा'; रशियाची अजस्त्र फौज मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI