एक्स्प्लोर

Cigarette Lighter: 20 रुपयांपेक्षा कमी किमतीचे सिगारेट लायटर वापरताय? मग ही बातमी तुमच्यासाठी... केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Cigarette Lighters Ban: केंद्र सरकारने 20 रुपयाहून कमी किमतीच्या लायटरला ड्यूटी फ्री वर्गातून काढून प्रतिबंधित वर्गात टाकलं आहे. त्यामुळे त्याच्या आयातीवर आता बंदी येणार आहे.

नवी दिल्ली: तुम्ही सिगारेट पित असाल आणि 20 रुपयाहून कमी किमतीचे पॉकेट लायटर (Cigarette Pocket Lighter Ban) वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सिगारेट लायटरच्या आयात धोरणात केंद्र सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 रुपयापेक्षा कमी किमतीच्या सर्व प्रकारच्या लायटर्सच्या आयातीवर बंदी आणण्याचा केंद्राने निर्णय घेतला आहे. या आधी या लायटर्सचा ड्यूटी फ्री वर्गात समावेश होता. आता त्यातून काढून प्रतिबंधित या वर्गामध्ये टाकण्यात आल्याने या लायटरची आयात करता येणार नाही. 

सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसणार आहे. देशात अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने 20 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सर्व प्रकारच्या लायटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. मात्र जर सीआयएफ म्हणजेच लायटरची किंमत, विमा आणि मालवाहतूक 20 रुपयांपेक्षा जास्त असेल तर हे लायटर आयात केले जाऊ शकतात.

या देशांतून लायटर आयात केले जातात

CIF चा वापर बाहेरील देशांमधून आयात केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ठरवण्यासाठी केला जातो. पॉकेट लायटर, गॅस लायटर, रिफिल किंवा रिफिल न करता येणाऱ्या लायटर्सवर बंदी घालण्यात आली आहे. पॉकेट, गॅस लाइटर, रिफिल किंवा रिफिल न करता येणाऱ्या लायटरची आयात गेल्या वर्ष 2022-23 मध्ये 6.6 दशलक्ष डॉलर्स होती. तर या वर्षी एप्रिलमध्ये त्याची किंमत 1.3 लाख डॉलर होती. हे चीन स्पेन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयात केले जातात.

गेल्या वर्षी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सरकारला पत्र लिहिले होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सिंगल यूज प्लॅस्टिक लाइटर्सवर बंदी घालण्यात यावी असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. दक्षिण भारतात, बहुतेक लोक काडेपेट्या बनवून आपला उदरनिर्वाह करतात. कमी किमतीच्या लायटरवर बंदी घातली तर दक्षिण भारतातील काडेपेटी बनवणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल असं ते म्हणाले होते. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget