एक्स्प्लोर

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीगडमध्ये काँग्रेसचा किल्ला डगमगला, भाजपकडून यशाची पेरणी तर बघेलांचं सरकार पडलं मागे, अशी आहे निकालाची स्थिती

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीगडमध्ये उपमुख्यमंत्री टीएस सिंह आणि प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांच्या पराभवामुळे काँग्रेसला दुहेरी झटका बसला. तसेच मुख्यमंत्री भूपेश बघेल हे त्यांचा गड राखण्यात यशस्वी होणार का हे काही वेळात स्पष्ट होईल. 

मुंबई : छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Chhattisgarh Election Results ) निकालासाठी मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली. त्यानंतर जनतेचा कौल समोर येऊ लागला. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस (Congress) पुढे होती, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. पण, त्यानंतरच्या कलामध्ये काँग्रेसला धक्का बसू लागला. परंतु अनेकांचा कौल हा काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार याकडे होता. पण त्यानंतर अनेक महत्त्वांच्या जांगांवर भाजपने (BJP) झेंडा फडकवला आणि काँग्रेसची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. दरम्यान छत्तीगडमध्ये उपमुख्यमंत्री टीएस सिंह आणि प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांच्या पराभवामुळे काँग्रेसला दुहेरी झटका बसला. तसेच मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे त्यांचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. 

छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले, त्यापैकी 12 बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जागा होत्या.  त्याचवेळी 17 नोव्हेंबरला 70 जागांवर मतदान झाले होते. काँग्रसेला दुहेरी झटका मिळाल्यानंतर दुसरीकडे, 2018 च्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली. त्यापैकी अनेक माजी मंत्र्यांनी त्यांचा गड राखण्यास कसोशीचे प्रयत्न करत यशाच्या दिशेने वाटचाल केली. त्यापैकी भैयालाल राजवाडे (बैकुंठपूर), अमर अग्रवाल (बिलासपूर), राजेश मुनत (रायपूर शहर पश्चिम), केदार कश्यप (नारायणपूर) आणि दयालदास बघेल (नवागढ) हे राज्याच्या मागील सरकारमध्ये मंत्री होते.  2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र यावेळी त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी कायम ठेवली आहे. तर राजनांदगावमधून माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी देखील आघाडी घेतली. 

मुख्यमंत्री बघेल गड राखण्यात यशस्वी 

छत्तीसगडमध्ये जोरदार चर्चा होती ते मुख्यमंत्री बघेल यांच्या जागेची. कारण निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात बघेल यांच्यावर महादेव बेटींग अॅप संदर्भात आरोप करण्यात आले, त्यामुळे काँग्रेसला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता होती. परंतु बघेल हे त्यांचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटणमधून विजयी झाले आहेत. त्यांनी येथून भाजपचे उमेदवार विजय बघेल यांचा 19723 मतांनी पराभव केला आहे. टीएस सिंग देव यांच्या अंबिकापूर जागेवर फेरमतमोजणी झाली आणि त्यांचा अवघ्या 94 मतांनी पराभव झाला.

उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

काँग्रेसेचे नेते आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंह यांना देखील मोठा धक्का बसला. त्यामुळे काँग्रेसची देखील बरीच दमछाक झाली. रगुजा विभागातील अंबिकापूर जागेवरील लढत ही बरीच रंजक झाली. त्या जागेवर उपमुख्यमंत्री टीएस सिंह आणि भाजपचे राजेश अग्रवाल हे उमेदवार होते. परंतु  टीएस सिंह देव हे 16 व्या फेरीपर्यंत पिछाडीवर होते. पण अखेरीस कौल हा राजेश अग्रवाल यांच्या बाजूने लागला आणि टीएस सिंह यांचा पराभव झाला. 

कवासी लखमा विजयी

नक्षलग्रस्त सुकमा येथील कोन्टा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कावासी लखमा विजयी झाले आहेत.त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. कावासी 1981 मतांनी विजयी झाले. ते सलग सहाव्यांदा आमदार झाले आहेत.

छत्तीगडमधील पक्षीय बलाबल

छत्तीगडमध्ये विधासभेच्या एकूण 90 जागांसाठी मतदान घेण्यात आले. 
काँग्रेस - 71 
भाजप - 15
इतर -  4

छत्तीसगडमधील निकालाची स्थिती

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपने या राज्यात 56 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या वाट्याला 34 जागा आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आलं. 

छत्तीसगड - एकूण जागा 90 

  • भाजप - 56
  • काँग्रेस - 34

हेही वाचा : 

Assembly Election Results : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा धुरळा, कुणाला किती जागा मिळाल्या? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकतेNagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढलीABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget