एक्स्प्लोर

Assembly Election Results : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा विजय, कुणाला किती जागा मिळाल्या? 

State Assembly Election Results : चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली असून तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे. 

मुंबई: पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (State Assembly Election Results) आज जाहीर झाला असून त्यापैकी तीन राज्यांवर भाजपने सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालंय. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. मिझोराम राज्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. राजस्थानमध्ये 115, मध्य प्रदेशमध्ये 165 तर छत्तीसगडमध्ये 56 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय. 

मिनी लोकसभा असं समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालंय. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आता खोटी ठरली असून भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त केला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. 

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या गेहलोत सरकारचा पराभव

गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या गेहलोत सरकारचा पराभव करून भाजपने राजस्थानच्या सत्तेची चावी स्वतःकडे घेतली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये सुरू असलेली राजकीय गटबाजी काँग्रेसला काही संपवता आलं नाही. त्यात भ्रष्टाचार आणि लाल डायरीचा मुद्दा गाजला. दुसरीकडे भाजपने हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आणि त्याला यश आल्याचं दिसून आलंय. राजस्थानमध्ये भाजपपने 115 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. 

राजस्थान - एकूण जागा 199

  • भाजप - 115
  • काँग्रेस - 70
  • इतर - 14 

मध्य प्रदेशमध्ये भाजपची खेळी यशस्वी

गेल्या 20 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा होती. त्यासाठी भाजपने आपल्या काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचीही ताकत भाजपच्या कामी आली. त्यामुळे या राज्यात पाचव्यांदा भाजपने सत्ता मिळवली आहे. 

मध्य प्रदेश- एकूण जागा 230

  • भाजप - 165
  • काँग्रेस - 64 
  • इतर - 01 

छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपने या राज्यात 56 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या वाट्याला 34 जागा आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आलं. 

छत्तीसगड - एकूण जागा 90 

  • भाजप - 56
  • काँग्रेस - 34

तेलंगणामध्ये काँग्रेसची जादू

गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव करत काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे. केसीआर यांच्या पक्षाला 39 जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने या ठिकाणी 64 जागा पटकावल्या आहेत. 

तेलंगणा - एकूण जागा 119

  • काँग्रेस - 64
  • बीआरएस - 39
  • भाजप - 08
  • एमआयएम - 08

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IND vs AUS Champions Trophy  : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलंABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025Job Majha : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधीPM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Embed widget