एक्स्प्लोर

Chhattisgarh Naxal Attack: बीजापूर नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट

नक्षलवाद्यांच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर हिडमा हा या भागात असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याला जेरबंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी ही मोहीम आखली. या हल्ल्याच्या वेळी हिडमा स्वत: उपस्थित होता.

रायपूर : छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचं स्पष्ट झालंय. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.

ही घटना घडायच्या आधी हिडमा टेकुलगुडा आणि जुनागुडा गावाच्या जवळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर त्या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून हिडमाला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, बीजपुर पोलिसांचे डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान बीजपुर आणि सुकमा जिल्ह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले होते.

शनिवारी दुपारी एक वाजायच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी जुनगुडा गावाजवळ सुरक्षा दलांवर पहिला हल्ला केला. तिथे नक्षलींनी यू आकाराची रचना करत सुरक्षा दलांना घेरले आणि जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्याना घेऊन पोलीस पार्टी पुढे जात असताना टेकुलगुडा येथे दुसरा हल्ला करण्यात आला. 

हल्ल्याच्या वेळी हिडमा स्वत: उपस्थित
टेकुलगुडा या ठिकाणी करण्यात आलेला हा हल्ला जास्त भीषण होता. अनेक तास दोन्ही बाजूनी गोळीबार झाला आणि त्यात सुरक्षा दलांचे सर्वाधिक नुकसान झाले. माहिती अशी आहे की या ठिकाणी, चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून  जवळच  स्वतः हिडमा उपस्थित होता. हल्ल्याच्या शेवटी तो 40 नक्षलीसोबत चकमकीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने टेकुलगुडा गावाच्या अंगणात अनेक पोलिसांची हत्या केली. 

आताच्या घडीला हिडमा हा सर्वात कुख्यात आणि क्रूरकर्मा नक्षली कमांडर समजला जातोय. त्याने बिजापूर सारखेच अनेक मोठे हल्ले पोलिसांवर घडविले आहे. तो गनिमी काव्याच्या हल्ल्याची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात चाणाक्ष मानला जातो. त्यामुळेच त्याच्याकडे नक्षलींच्या मिलिटरी युनिटच्या कमांडर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Delhi : त्यांच्या अश्रूंना काय किंमत ? रडतील रडतील आणि… संजय राऊतांचा घणाघात #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Embed widget