एक्स्प्लोर
बळ्ळारीत बसवेश्वर यात्रेत लाकडी रथ कोसळला, 6 गंभीर जखमी
बंगळुरु : कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यात बसवेश्वर यात्रेवेळी लाकडी रथ कोसळल्यानं 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बळ्ळारी जिल्ह्यात कोटूर गावी सुरु असलेल्या बसवेश्वर यात्रेतील रथाचा एक्सल अचानक तुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे.
मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. बसवेश्वर यात्रेतील गुरु कोट्टुरेश्वर स्वामी याच्या रथोत्सवात 60 फुटी रथ कोसळला. या रथाचा एक्सल तुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यात 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेत आणखी कितीजण जखमी आहेत याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान रथोत्सवात असंख्य भाविक उपस्थित होते. त्यामुळे रथोत्सवावेळी पुरेशी खबरदारी घेतली होती का, तसंच या रथोत्सवात आणखी कितीजण जखमी आहेत याचाही तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement