(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2021 च्या सुरूवातीला लॉन्च होणार चांद्रयान-3
भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी होऊ शकली नाही. चांद्रयान-2 मोहिमेत पाठवण्यात आलेलं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँड होऊ शकलं नव्हतं. चांद्रयान-2 मोहिमेत चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.
नवी दिल्ली : चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी संबंधित नविन माहिती समोर आली आहे. चांद्रयान-3 हे 2021 सालच्या पहिल्या सहा महिन्यात झेपवण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली. दी. रविकुमार डी यांनी विचारलेल्या लिखित प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे.
यापूर्वी इस्त्रो चीफ के. सिवन यांनी सांगितले होते की, चांद्रयान-2 मधील लँडरची गती जास्त असल्यामुळे योग्य पद्धतीने नेवीगेट करू शकत नाही आणि यामुळेच हार्ड लँडिंग झाली आहे. तसेच चुकीचा आरोप लावण्यात येत आहे की, चांद्रयान-2 अयशस्वी झाल्यामुळे इतर सॅटेलाइट्सच्या लॉन्चिंगमध्ये उशीर होत आहे. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी रॉकेट्स तयार करण्यात येतात. जसं आमच्याकडे रॉकेट्स उपलब्ध होतात, त्यावेळी आम्ही लॉन्च करतो. तसेच 2020 मार्चपर्यंत आम्ही 2019मधील सर्व सॅटेलाइट्स लॉन्च करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं होतं.
Chandrayaan-3 will be launched in first half of 2021: Government
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2020
भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी होऊ शकली नाही. चांद्रयान-2 मोहिमेत पाठवण्यात आलेलं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँड होऊ शकलं नव्हतं. चांद्रयान-2 मोहिमेत चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी डेटा विश्लेषण केलं होतं. चांद्रयान-2 मोहिमेत फक्त लँडिंगमध्ये इस्रोला अपयश आलं आहे. या मोहिमेतील ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असून तो पुढची काही वर्ष कार्यरत राहील, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
चांद्रयान पुन्हा झेपावणार; चांद्रयान-3 ला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल
'या' ठिकाणी चांद्रयान 2 उतरलं, नासाकडून फोटो जारी
'इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी', 'नासा'कडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक