'या' ठिकाणी चांद्रयान 2 उतरलं, नासाकडून फोटो जारी
अमेरीकन अंतराळ संस्था नासाच्या 'लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा'द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने भारताचं चांद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलं होतं. त्या ठिकाणचे काही हाय रेजॉल्यूशनचे फोटोदेखील काढले आहेत.
नासाने पाठवलेला फोटो दरम्यान काही दिवसांपूर्वी 'नासा'ने भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. नासाने ट्विटरमार्फत चांद्रयान 2 मोहिमेची प्रशंसा केली होती.Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images will be taken in October during a flyby in favorable lighting. More: https://t.co/1bMVGRKslp pic.twitter.com/kqTp3GkwuM
— NASA (@NASA) September 26, 2019
Space is hard. We commend @ISRO’s attempt to land their #Chandrayaan2 mission on the Moon’s South Pole. You have inspired us with your journey and look forward to future opportunities to explore our solar system together. https://t.co/pKzzo9FDLL
— NASA (@NASA) September 7, 2019
"अंतराळात शोधकार्य कठीण गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -2 उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही केलेल्या या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचं नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे" असं 'नासा'ने ट्वीट केलं.
चांद्रयान-2 बाबत आशा कायम... इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांच्याशी बातचीत | ABP Majha
जेव्हा चंद्राच्या अवघ्या काही अंतराच्या उंचीवर चांद्रयान 2 मोहिमेतील निक्रम लॅंडरशी संपर्क तुटला केव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या आणि तब्बल कोट्यावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. देशभरातच नाही तर जगभरातून इस्रोचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. या कामगिरीची नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेनेदेखील दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात सोबत काम करण्याची इच्छादेखील नासाने ट्वीटमार्फत व्यक्त केली
ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या लॅंडरचा फोटो पाठवला : के सिवन
संबंधित बातम्या : Chandrayaan 2 | इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींनी धीर दिला! Chandrayaan-2 | विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा कायम, इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु