एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करा, केंद्राचं राज्यांना पत्र
केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी घटवल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांनी कपात झाली आहे. त्यानंतर आता केंद्र राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी आग्रह करणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी कमी केल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर आता पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत विचारणार करणार आहेत. ज्या राज्यांनी 25 ते 49 टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारलेला आहे, अशा राज्यांना व्हॅट कमी करण्याची विनंती केली जाऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
केंद्र सरकाकडून सध्या 21.48 रुपये प्रती लिटर एक्साईज ड्युटी आकारली जाते. यामध्ये आता दोन रुपयांची कपात केल्यानंतर हा दर 19.48 रुपयांवर आला आहे. नवे दर आज (4 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात 2014 नंतर कच्च्या तेलाची किंमत सतत घसरली. मात्र सरकारने त्यावरील एक्साईज ड्युटी वाढवल्याने याचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. पेट्रोल अनेक राज्यांमध्ये 80 रुपयांचा दर गाठला आहे. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने 2 रुपये एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement