एक्स्प्लोर
'HIT मारल्यावर किती मच्छर मारले गेले हे मोजत बसू का, आरामात झोपू?' केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंहांचा सवाल
किती अतिरेकी ठार झाले असावेत, याचा नेमका आकडा देणाऱ्या व्ही के सिंह यांनीही काल सकाळी जाहीर केलेला आकडा लपवण्यासाठी HIT या डास मारण्याच्या औषधाचं उदाहरण दिलं आहे.
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी मारले गेले, या प्रश्नाचं भाजपाच्या मंत्र्याकडून अजूनही नीट उत्तर मिळत नाहीय. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यापासून वेगवेगळ्या पातळीवरचे नेते आणि केंद्रीय मंत्री दररोज वेगवेगळे आकडे देत आहेत. कालच माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी बालाकोटच्या हवाई हल्ल्यात 250 अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला होता. ते माजी लष्कर प्रमुख असल्याने त्यांच्या दाव्याला प्रसिद्धीही मिळाली. पण आज मात्र त्यांनी एक ट्वीट करून HIT ने मच्छर मारल्यावर, किती मच्छर मेले ते मोजत बसायचं का शांतपणे झोपी जायचं? असा प्रश्न केला आहे.
भारतीय हवाई हल्ल्यानंतर किती अतिरेकी मारले गेले याचे वेगवेगळ्या भाजप नेत्यांकडून वेगवेगळे आकडे दिले जात असताना काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी, परराष्ट्र सचिवांनी हल्ल्याबाबत जी माहिती दिली तेवढीच अधिकृत आणि खरी असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर किती अतिरेकी ठार झाले असावेत, याचा नेमका आकडा देणाऱ्या व्ही के सिंह यांनीही काल सकाळी जाहीर केलेला आकडा लपवण्यासाठी HIT या डास मारण्याच्या औषधाचं उदाहरण दिलं आहे. डास मारण्यासाठी HIT फवारल्यानंतर किती डास मेले हे न पाहता शांतपणे झोपी जावं असा सल्लाही त्यांनी दिलाय, याचाच अर्थ बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती अतिरेकी ठार झाले, हे समजणार नाही, याचा शोधही घेऊ नये असं त्यांनी सुचवलंय.
परवा सकाळीच हवाई दल प्रमुख बीएस धनोआ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवाई दल त्यांना दिलेलं लक्ष्य अचूक टिपतं, किती नुकसान झालंय किंवा अपेक्षित नुकसान झालंय की नाही याचा आढावा घेत बसत नाही, असं स्पष्ट केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement