एक्स्प्लोर
Advertisement
गहू, ज्वारी, हरभऱ्याचे भाव वाढणार; रब्बी पिकांचा हमीभाव वाढवण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने देशभरातली शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठ्या निर्णयांचे फटाके फोडले आहेत. केंद्र सरकारकडून गहू, ज्वारी, हरभरा आणि सूर्यफुलासह रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 85 रुपये ते 325 रुपयांपर्यंत असणार आहे. देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने डबघाईला आलेल्या एमटीएनएल आणि बीएसएनलच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणानंतर जन्माला येणाऱ्या कंपनीसाठी बॉन्डच्या माध्यमातून 15 हजार कोटी, तर संपत्ती विक्रीतून 38 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यापुढे 250 कोटींची उलाढाल असलेली कंपनी पेट्रोल आणि डिझेलची विक्री करु शकणार आहे. यापूर्वी 2500 कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्याच इंधनाची विक्री करु शकत होत्या.
Union Minister Prakash Javadekar: Cabinet has decided to increase the Minimum Support Price (MSP) for Rabi crops, MSP for wheat and barley has been increased by Rs 85 , gram by Rs 255, Masur (Lentil) by Rs 325, mustard by Rs 225. pic.twitter.com/ZqulWe9p50
— ANI (@ANI) October 23, 2019
Union Cabinet approves revival plan of BSNL (Bharat Sanchar Nigam Limited)&MTNL (Mahanagar Telephone Nigam Limited)&in-principle merger of the two. Spectrum of 4G to be allocated to Telecom PSEs (Public Sector Enterprises).VRS (voluntary retirement scheme) packages to be offered. https://t.co/KluEorlN9A
— ANI (@ANI) October 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement