एक्स्प्लोर

आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं? केंद्रीय माहिती आयोगाच्या नोटीसनंतर सरकारचं स्पष्टीकरण

आरोग्यसेतू अ‍ॅप अतिशय पारदर्शी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे आणि गोपनीय धोरणासह सर्व तपशील आणि कागदपत्रे तसेच डेटा अ‍ॅक्सेस आणि माहिती सामायिक करण्याविषयीचे प्रोटोकॉल 11 मे 2020 रोजी जारी करण्यात आले.

नवी दिल्ली : कोरोना काळात सरकारने बनवलेल्या आरोग्य सेतू अॅपवरून वाद निर्माण झाला आहे. हे अॅप नेमकं बनवलंय कुणी याचं उत्तरच सरकारला देता येत नाहीय, असं माहिती अधिकारात उघड झालं होतं. यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्यसेतू अ‍ॅप विक्रमी 21 दिवसांत विकसित करण्यात आले. टाळेबंदीतील निर्बंध आणि मेड इन इंडिया संपर्क मागोवा अ‍ॅप विकसित करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग, शैक्षणिक विभाग आणि सरकार यांनी 24 तास कार्यरत राहून संक्रमण परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मजबूत, व्यापक आणि सुरक्षित अ‍ॅप विकसित केले, असं सरकारने म्हटलं आहे.

आरोग्य अॅप नेमकं बनवलंय कुणी याचं उत्तरच सरकारला देता येत नाहीय. सौरव दास या सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेत हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर आता केंद्रीय माहिती आयोगानं यावर एनआयसी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याबद्दलचा जाब विचारलाय.

याबाबत उत्तर देताना सरकाने म्हटलं की, आरोग्यसेतू अ‍ॅप आणि त्याचे कोविड-19 संक्रमण रोखण्यातील महत्त्व याविषयी कसलीही शंका नाही. 2 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजेस आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केल्याप्रमाणे, भारत सरकारने कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने लोकांना एकत्र आणण्यासाठी आरोग्यसेतू अ‍ॅप सुरू केले. आरोग्यसेतू अ‍ॅप विक्रमी 21 दिवसांत विकसित करण्यात आले. लॉकडाऊनमधील निर्बंध आणि मेड इन इंडिया संपर्क मागोवा अ‍ॅप विकसित करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग, शैक्षणिक विभाग आणि सरकार यांनी 24 तास कार्यरत राहून संक्रमण परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मजबूत, व्यापक आणि सुरक्षित अ‍ॅप विकसित केले. 2 एप्रिल 2020 पासून आरोग्यसेतू अ‍ॅपवर अधिकृत बातम्या आणि अपडेटस प्रसारीत केले, यात 26 मे 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या ओपन सोर्स कोडचाही समावेश आहे. अ‍ॅप विकसित करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी संबंधित सर्व व्यक्तींची नावे प्रसार माध्यमांतून जाहीर करण्यात आली, असं सरकारने स्पष्ट केलं.

आरोग्य सेतू अॅपचा उगम कुठून? सरकारकडेच उत्तर नसल्यानं केंद्रीय माहिती आयोगानं खडसावलं

एनआयसीने या अ‍ॅप संबंधित उद्योग आणि शैक्षणिक जगताच्या सहकार्याने विकसित केला आहे. आरोग्यसेतू अ‍ॅप अतिशय पारदर्शी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे आणि गोपनीय धोरणासह सर्व तपशील आणि कागदपत्रे तसेच डेटा अ‍ॅक्सेस आणि माहिती सामायिक करण्याविषयीचे प्रोटोकॉल 11 मे 2020 रोजी जारी करण्यात आले आणि ते aarogyasetu.gov.in या आरोग्यसेतू पोर्टलवर अपलोड करण्यात आले. पोर्टलवर अ‍ॅपची कार्यपद्धती, कोविड अपडेटस आणि आरोग्यसेतूचा वापर का करावा याचा तपशील उपलब्ध आहे. आरोग्यसेतू अ‍ॅपविषयीचे नियमित अपडेटस समाजमाध्यमातून आणि सरकारी पोर्टलवर वेळोवेळी सामायिक केले जात आहेत. अनेक दूरचित्रवाहिनी कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांतून अ‍ॅपचा तपशील, त्याचा विकास आणि कोविड-19 विरोधातील लढाईतील सहाय्य याविषयी माहिती देण्यात आली.

शासकीय आणि खासगी सहभागातून अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. आतापर्यंत 16.23 कोटी वापरकर्त्यांनी अ‍ॅप डाऊनलोड केला आहे आणि कोविड-19 विरोधातील लढाईत आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना याची मोठी मदत होत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ब्ल्युटूथ संपर्कातून शोधण्यास मदत झाली आहे आणि नागरिकांना सुरक्षित राहण्यास यामुळे मदत झाली आहे. ब्ल्युटूथ संपर्क माध्यमातून कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना सूचना, अलगीकरण किंवा चाचणी याविषयी सूचित केले जाते. या माध्यमातून ज्या व्यक्तींना चाचणी करण्यास सांगण्यात आले होते, त्यापैकी 25 टक्के व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळल्या. एकूण पॉझिटिव्ह दर 7-8 टक्के पेक्षा हे प्रमाण अधिक आहे. अशाप्रकारे चाचण्यांची कार्यक्षमता आरोग्यसेतूमुळे वाढली आहे. याव्यतिरिक्त, आरोग्यसेतू इतिहास (ITIHAS) प्रणालीमुळे आरोग्य प्राधीकरण आणि प्रशासनाला संभाव्य हॉटस्पॉटसची माहिती मिळाली आणि त्यापद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget