एक्स्प्लोर

आरोग्य सेतू अॅपचा उगम कुठून? सरकारकडेच उत्तर नसल्यानं केंद्रीय माहिती आयोगानं खडसावलं

आरोग्य सेतू अॅप नेमकं बनवलंय कुणी याचं उत्तरच सरकारला देता येत नाहीय. सौरव दास या सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेत हा प्रकार उघड झालाय.

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीत आपलं आयुष्य न्यू नॉर्मल बनलंय. ज्या गोष्टी या काळात नव्यानं आल्या त्यापैकी एक म्हणजे सरकारी पातळीवरुन आलेलं आरोग्य सेतू नावाच अॅप. पण आता या अॅपपाठीमागे नेमकं आहे कोण? त्याचा ओरिजन काय? याचीच उत्तरं सरकार देत नाही.

आरोग्य सेतू अॅप कोरोनाच्या महामारीत सरकारनं हे अॅप जिकडे तिकडे आवश्यक करुन टाकलं की तो आता अगदी परवलीच शब्द बनला आहे. पण धक्कादायक म्हणजे हे अॅप नेमकं बनवलंय कुणी याचं उत्तरच सरकारला देता येत नाहीय. सौरव दास या सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेत हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर आता केंद्रीय माहिती आयोगानं यावर एनआयसी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याबद्दलचा जाब विचारलाय.

काय आहे आरोग्य सेतूचं गौडबंगाल?

- कोरोनाच्या काळात लोकांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी आरोग्य सेतू हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप सरकारनं प्रोजेक्ट केलं. - या अॅपच्या वेबसाईवटर हे अॅप नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर अर्थात एनआयसीनं डिझाईन, डेव्हलेप केल्याचं म्हटलं आहे. - पण माहिती अधिकार याचिकेला उत्तर देताना एनआयसी म्हणते या अॅपचा उगम नेमका कुठून झाला हे आम्हाला माहिती नाही. ते कसं तयार झालं हे आम्ही सांगू शकत नाही. - या अॅपच्या निर्मितीत नीती आयोगाच्या काही इनपुटचा आधार घेण्यात आला इतकंच आम्ही सांगू शकतो.

आता पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी प्रोजेक्ट केलेलं हे अॅप. अनेक सार्वजनिक ठिकाणी, विमान मेट्रोच्या प्रवासातही ज्याचा आग्रह धरला जातो त्या अॅपबद्दल इतकी बेसिक माहितीच सरकारकडून उपलब्ध होत नसेल तर त्याला काय म्हणायचं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत लोकांना योग्य माहिती मिळतेय की नाही हे पाहणं हे केंद्रीय माहिती आयोगाचं काम. एनआयसीकडून असं टाळाटाळ करणारं उत्तर आल्यावर माहिती आयोगानं या खात्याच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. माहिती देण्यात कुचराई केल्याबद्दल तुमच्यावर या कायद्याच्या कलम 20 अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल त्यांनी विचारलाय. 24 नोव्हेबरला याचं उत्तर घेऊन हजर राहण्याचे आदेशही आयोगानं दिलेत.

आरोग्य सेतू अॅप तयार झाल्यानंतरच त्याबद्लचे वाद सुरु झाले होते. फ्रान्सचा प्रसिद्ध एथिकल हॅकर एलियट अल्डरसन या टोपण नावानं ट्विटरवर आहे..त्यानं जाहीरपणे या अॅपमध्ये डेटा कसा लीक होऊ शकतो याचा डेमो दिला होता. पण त्यावेळी सरकारी संस्थांकडून हे आरोप नाकारण्यात आले होते. राहुल गांधी यांनीही हे अॅप म्हणजे नागरिकांवर पाळत ठेवण्याची सभ्य यंत्रणाच असल्याचं म्हटलं होतं. त्यात आता या अॅपच्या निर्मितीबद्दल प्रश्न विचारल्यावर सरकार टाळाटाळ करत असेल तर त्यामागचं गूढ वाढणं साहजिक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget