Lockdown | लॉकडाऊन वाढणार नाही; केंद्रीय सचिव राजीव गाबा यांची माहिती
21 दिवसांचं लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही मीडिया रिपोर्ट आणि सोशल मीडियातून फिरत आहे. मात्र, लॉकडाऊन वाढणार नसल्याचे केंद्रीय सचिव राजीव गाबा यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली : गेल्या दोनतीन दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमांच्या रिपोर्टमधून 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्यांचं केंद्रीय सचिव राजीव गाबा यांनी खंडन केलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यता मीडिया रिपोर्ट मधून सांगितल्या जात आहे. तर, सोशल मीडियावर हा लॉकडाऊन मोठ्या कालावधीसाठी वाढण्यार असल्याचे संदेश फिरत आहे. याची दखल घेत केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने घेत अफवा पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्याची साखळी तोडणे फार आवश्यक आहे. त्यामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. या काळात कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Alert : There are rumours & media reports, claiming that the Government will extend the #Lockdown21 when it expires. The Cabinet Secretary has denied these reports, and stated that they are baseless#PIBFactCheck#lockdownindia #coronaupdatesindia #IndiaFightsCorona
— PIB India ???????? #StayHome #StaySafe (@PIB_India) March 30, 2020
लॉकडाऊन वाढणार? गेल्या दोनतीन दिवसांपासून लॉकडाऊन वाढणार असल्याचे मीडिया रिपोर्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. याला दाखला म्हणून सरकारच्या काही गोष्टींचा दाखला देण्यात येत आहे. सरकारने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी जी ओळखपत्र दिली आहे, त्यावर असणारा कालावधी तीन महिन्यांचा आहे. आरबीआयने देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांना कर्जाचे हप्ते तीन महिन्यांसाठी स्तगित करण्याचा दिलेला सल्ला. महाराष्ट्रातही तीन महिने पुरेल एवढे धान्य देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वरील बाबींवरुन लॉकडाऊन वाढणार असल्याचा निष्कर्ष सोशल मीडियातून काढण्यात येत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी विचार नसल्याचं केंद्रीय सचिव राजीव गाबा यांनी सांगितलय.
Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच
देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आत्ताच्या घडीला देशात 1170 जण कोरोनाग्रस्त आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रात 215 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर केरळ राज्यात 202 रुग्ण सापडले आहेत. देशभरात 102 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 29 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Coronavirus | महाराष्ट्रातील 200 विद्यार्थी रशियात अडकले, सरकारकडून दुर्लक्ष, विद्यार्थ्यांची खंत