एक्स्प्लोर

अर्थ बजेटचा : पियुष गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Budget 2019 Highlights: Union Budget 2019 Summary, Interim Budget 2019 Key Points

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची मंजुरी घेतली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने समाजातील विविध घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असा आर्थिक विश्लेषकांचा अंदाज आहे. पियुष गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अरुण जेटलींना आत्ता या क्षणाला मिस करतोय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना. बजेटच्या सुरुवातीलाच पियुष गोयल यांच्या भावना गेल्या पाच वर्षात देशाला प्रगतिपथावर आणलं, देशाचा आत्मविश्वास वाढवला 2020 पर्यंत प्रत्येकाला घर, पाच वर्षात महागाईला आळा बसला 2020 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार यांचं कंबरडं मोडलं, महागाईचा दर घटला सरकारच्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावला जीएसटी लागू करणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठं पाऊल सरकारने बँकिंग क्षेत्रातील चुकीच्या गोष्टी बंद केल्या भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्ही पारदर्शकतेचं एक नवीन युग सुरू केलं, भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवले राज्यांना आधीच्या तुलनेत दहा टक्के अधिक निधी आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायच बँकांच्या कर्जवसुलीत वेग, मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणली, रेरा कायदा फायदेशीर ठरला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख 53 हजार घरं बांधली गरीबांना स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची तरतूद बँकांचे पैसे बुडवून पळून गेलेल्यांसाठी कठोर कायदे बनवले गावांचं अस्तित्व टिकवून तिथे शहरांप्रमाणे सुविधा दिल्या सौभाग्य योजनेतून घरोघरी वीजजोडणी आयुष्मान योजनेमुळे गरीबांचे तीन हजार कोटी रुपये वाचले 143 कोटी एलईडी लाईट दिले, 2021 पर्यंत प्रत्येक गावात वीजजोडणी आयुष्मान विमा सुरक्षेअंतर्गत दहा लाख जणांवर उपचार ग्रामसडक योजनेमुळे प्रत्येक गावात रस्ते पोहचले दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट सहा हजार जमा होणार. 1 डिसेंबर 2018 पासूनच योजना लागू होणार. 3 हप्त्यात ही रक्कम जमा होणार. 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना. पहिला हप्ता दोन हजार रुपयांचा निवडणुकीच्या आधीच जमा होणार. असंघटित कामगारांसाठी 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना' जाहीर. 15 हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांना पेन्शन, 100 रुपये महिना भरून 60 वर्षांनंतर महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळणार, दहा कोटी मजुरांना फायदा वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच लागू, 21 हजार वेतन असलेल्या मजुरांना सात हजारांचा बोनस, ग्रॅच्युईटची मर्यादा दहा लाखांवरुन 30  लाखांवर संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी दिल्याचा दावा. तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद करणार गर्भवतींना 26 आठवड्यांची भरपगारी सुट्टी 40 वर्षांपासून रखडलेली वन रॅन्क वन पेन्शन योजना लागू रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद भारतात मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ, देशात सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा येत्या पाच वर्षात एक लाख डिजिटल गावांची निर्मिती करु चित्रपट सृष्टीसाठी काही योजना जाहीर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या कडून 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा उल्लेख. त्यानंतर मागच्या बाकावरुन सत्ताधारी खासदारांनी 'how's the Josh' चा आवाज दिला. मध्यमवर्गीय करदात्यांसाठी बजेटमध्ये कुठलाही दिलासा नाही. सरकारने आधीच्या पाच वर्षात करसवलतीसाठी काय काय केलं याचाच पाढा वाचला
काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध, 3 लाख 38 हजार बोगस कंपन्यांना टाळं लावलं, एक कोटी नागरिकांनी नोटाबंदीनंतर कर भरला, एक लाख 36 हजार कोटींची करवसुली : पियुष गोयल
पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, तीन कोटी करदात्यांना नव्या कररचनेचा फायदा होणार
नोकरदारांसाठी Standard tax deduction 40 हजारांवरुन 50 हजारांवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget