ABP Majha Morning Headlines : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
आनंदावर विरजण! यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू
रमजान उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
चार धाम यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, उत्तराखंडमधील सात जिल्ह्यात आज मॉकड्रिल
उत्तराखंडमधील चार धाम यात्रेची (Char Dham yatra 2023) तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. बद्रीनाथ , केदारनाथ , गंगोत्री आणि यमुनोत्रीची यात्रा लवकरच सुरू होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
राहुल गांधींच्या खासदारकीवर सूरत कोर्टात निकालाची शक्यता
राहुल गांधींच्या खासदारकीबाबत याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर
देशभरात कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी चिंतेत; नेमकी का होतेय दरात घसरण?
सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. महाराष्ट्रात देखील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, कांद्याचे दरात नेमकी घसरण का झाली? वाचा सविस्तर
देशात साखरेचं उत्पादनात घटलं, मात्र उत्तर प्रदेशमध्ये वाढलं; तर महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये घटलं
देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात आत्तापर्यंत साखरेच्या उत्पादन सहा टक्क्यांची घट झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माने (ISMA) याबाबतची माहिती दिली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशात साखरेचे उत्पादन हे सहा टक्क्यांनी घटून 3 कोटी 11 लाख टनांवर आलं आहे. वाचा सविस्तर
मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कर्क राशीच्या लोकांना आनंद आणि लाभाची संधी मिळेल. तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठीही आज एकूणच परिस्थिती अनुकूल राहील. मेष ते मीन राशीसाठी गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
नाझी हुकूमशहा हिटलरचा जन्म, भारतीय परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देणारे इंद्रकुमार गुजराल पंतप्रधानपदी; आज इतिहासात
जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटरलचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्यानंतर त्याने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. भारतीय परराष्ट्र धोरणाला गुजराल डॉक्ट्रिनच्या माध्यमातून नवी दिशा देणारे इंद्र कुमार गुजराल यांनी आजच्याच दिवशी भारताचे 12 पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या ते पाहू, वाचा सविस्तर























