Rahul Gandhi: राहुल गांधींच्या खासदारकीवर सूरत कोर्टात निकालाची शक्यता, कोर्टानं राहुल गांधींना दोषमुक्त सिद्ध केल्यास पुन्हा खासदारकी मिळणार
Rahul Gandhi: 2019 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवत सूरत न्यायालयाकडून खासदारकी रद्द झाली होती. आज कोर्टाचा यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या खासदारकीबाबत याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार? आज कोर्टाचा यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधींविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या विरोधात, न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल चार वर्षांनी निकाल दिला. न्यायलयाच्या निकालानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळं राहुल गांधींनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली.























