कोरोना रुग्णांमध्ये Black Fungus संसर्गाचा धोका वाढला, ICMR ने जारी केल्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये Black Fungus इन्फेक्शन होत असल्याचं दिसून येतंय. त्याचा वेळेवर उपचार न केल्यास ते अत्यंत धोकादायक ठरु शकतं असं ICMR ने आपल्या सूचनांत सांगितलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्ण आणि त्यातून बऱ्या झालेल्या लोकांसमोर आता नवी समस्या निर्माण झाली आहे. गेले काही दिवस अशा लोकांमध्ये Black Fungus चा संसर्ग, ज्याला Mucormycosis असंही म्हटलं जात, त्याचा धोका वाढत आहे. यावर आयसीएमआरने सुचना जारी केली असून त्यात सांगण्यात आलंय की अनियंत्रित मधुमेह आणि उपचाराच्या दरम्यान आयसीयूमध्ये जास्त काळ राहिलेल्या कोरोना रुग्णांवर Black Fungus म्हणजेच Mucormycosis चा उपचार वेळेवर झाला नसल्यास ते धोकादायक ठरु शकतं.
Evidence based Advisory in the time of #COVID-19 (𝐒𝐜𝐫𝐞𝐞𝐧𝐢𝐧𝐠, 𝐃𝐢𝐚𝐠𝐧𝐨𝐬𝐢𝐬 & 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐦𝐞𝐧𝐭 𝐨𝐟 𝐌𝐮𝐜𝐨𝐫𝐦𝐲𝐜𝐨𝐬𝐢𝐬) @MoHFW_INDIA @PIB_India @COVIDNewsByMIB @MIB_India #COVID19India #IndiaFightsCOVID19 #mucormycosis #COVID19Update pic.twitter.com/iOGVArojy1
— ICMR (@ICMRDELHI) May 9, 2021
आयसीएमआरने गुरुवारी काही सुचना जारी केली असून त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, हा संसर्ग झाल्यास डोळे, गाल आणि नाक यांच्यावर परिणाम होतो. Black Fungus मुळे फुफ्फूसांना संसर्ग होतो आणि श्वासोश्वासातमध्ये अडचणी येतात.
या आजारावर लवकर उपचार केले नाही तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या आजाराचे लवकर निदान होणं गरजेचं असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.
काय आहे Black Fungus संसर्ग?
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
Black Fungus ची लक्षणे काय?
चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत.
या रोगापासून बचाव कसा करायचा?
कोरोनातून बरं झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण सातत्यानं तपासावं. कोणत्याही औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयसीएमआरच्या निर्देशकांचे पालन करावं.
महत्वाच्या बातम्या :