एक्स्प्लोर
भाजपाध्यक्ष अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली
अमित शाह पश्चिम बंगालमध्ये सभेसाठी गेले होते. अंगात ताप असतानाही ते सकाळच्या वेळात एका रॅलीत सहभागी झाले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीला परतावं लागलं
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. ताप वाढल्यामुळे अमित शाह पश्चिम बंगालहून दिल्लीला परतले. शाहांना गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लूचं निदान झालं होतं.
अमित शाह पश्चिम बंगालमध्ये सभेसाठी गेले होते. अंगात ताप असतानाही ते सकाळच्या वेळात एका रॅलीत सहभागी झाले. मात्र त्यावेळीही ते सारखे खोकत असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे शाहांना तात्काळ घरी परतावं लागलं.
डॉक्टरांनी अमित शाहांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये नियोजित शाहांच्या पुढील सर्व सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
गेल्याच आठवड्यात अमित शाहांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. शाह यांनी स्वत: ट्वीट करुन आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली होती. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच बरा होईन, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर दोन-तीन दिवसांत त्यांना 'एम्स'मधून डिस्चार्जही देण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement