(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kailash Vijayvargiya on Agnipath : भाजप कार्यालयाच्या बाहेर 'सिक्योरिटी गार्ड' नेमायचे असल्यास 'अग्नीवीर'ना प्राधान्य, भाजप नेत्याची ऑफर
कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
Kailash Vijayvargiya on Agnipath : अग्निपथ योजनेवरून (agneepath protest) देशातील बहुतांश भागात संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे ही योजना किती फायदेशीर आहे हे सांगण्यासाठी देशभरात घसा कोरडा करून सांगत आहेत. इंदूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी एक पाऊळ पुढे जाऊन एक वक्तव्य केले असून, त्यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. भाजप कार्यालयात सिक्योरिटी आम्हाला नेमायचे झाल्यास अग्निवीरांना प्राधान्य देतील, असे कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये म्हटले आहे.
कैलास विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा इतका अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात. कारण, त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर पहारेकरी व्हायचे आहे म्हणून नाही.
भाजप कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ
बिहार आणि यूपीनंतर आता मध्य प्रदेशातही अग्निपथ योजनेवरून तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. इंदूरमध्ये विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून निदर्शने करत आहेत. आज कैलाश विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदूरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्नीवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सडकून टीका
अग्निपथबाबतच्या सर्व शंका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अग्निपथबाबतच्या सर्व शंका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावरून दूर झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा सत्याग्रह याच मानसिकतेविरुद्ध आहे.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्वीट केले आहे की, भारतीय तरुणांनी अग्निपथ योजनेबद्दल घाबरू नये. 4 वर्षांनंतर त्यांना भाजप कार्यालयाचा चौकीदार बनवण्यात येणार आहे, समाजवादी पार्टी मीडिया सेलने ट्विट केले आहे की हे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय आहेत, ते म्हणतात की हे साहेब अग्निवीरांना भाजप कार्यालयात चौकीदार / शिपायाची नोकरी देतील. देशाच्या सेवेच्या भावनेने देशातील तरुणांचे हेच भविष्य असेल का ? देशातील तरुण/सैनिकांना काही उद्योगपती/भाजपच्या दारात नोकऱ्या देणार का?
विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अग्निवीरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करून पक्षाला गोंधळात टाकले आहे. कैलास यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या