Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले आहेत.

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध (Israel-Iran War) सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले आहेत.
गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे. गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवण्यास सुरुवात झाल्याने मुंबईतील सद्यस्थितीत दहा ते वीस टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार (असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट) संघटनेकडून देण्यात आली आहे. (Gas Shortage Mumbai)
आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅसचा पुरवठा- (Israel-Iran War Affect Mumbai Hotel)
पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल बंद करण्याची वेळ आहार संघटनेवर येईल, असं संघटनेच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील विविध ठिकाणी हॉटेल्स मध्ये गॅस पुरवठा कमी असल्याने आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅसचा पुरवठा आहे. त्यामुळे त्या हॉटेल बंद ठेवावे लागतील, असं असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
घरगुती गॅस वापरला सरकारचे प्राधान्य- (Gas Shortage Mumbai)
आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसणार आहे. युद्धामुळं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी साठी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले असून, साठेबाजी/काळ्या बाजाराला रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. आयातित एलपीजी पासून होणाऱ्या नॉन-डोमेस्टिक पुरवठ्याला रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे.
सोलापूरात इंधनाचा तुटवडा टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना- (Solapur News)
सोलापूर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिका इस्राईल इराण पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास गॅसचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा पातळीवर दक्षता किंवा फिरते पथक स्थापन करून गॅस वितरकांवर लक्ष ठेवण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत. तालुक्यात घरगुती एलपीजी गॅस सुरळीत वितरण होणे, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता आणि फिरते पथक लक्ष ठेवणार आहे. तालुकानिहाय दक्षता किंवा फिरत्या पथक नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पत्रक काढले आहे.
आखाती युद्धाचा भारतावरही परिणाम, उद्योगांसह हॉटेल व्यवसायालाही तडाखा, Video:
संबंधित बातमी:






















