एक्स्प्लोर

NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार

NCERT: इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर NCERT ला बिनशर्त माफी मागावी लागली आहे.

NCERT: इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात National Council of Educational Research and Training (NCERT) ला अखेर बिनशर्त माफी मागावी लागली आहे. या संदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील एका प्रकरणात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला होता. शालेय स्तरावर न्यायपालिकेबद्दल अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) याची स्वतःहून (suo motu) दखल घेतली. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत NCERT कडून स्पष्टीकरण मागितले.

NCERT ने न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी

सुप्रीम कोर्टाच्या फटकारानंतर NCERT ने न्यायालयाची बिनशर्त माफी मागत हा मजकूर हेतुपुरस्सर समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. मात्र त्यामधील काही मजकूर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याची कबुली देत NCERT ने खेद व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरण पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित मजकूरासह पुस्तकाची नवीन आवृत्ती शैक्षणिक सत्र 2026-27 च्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती NCERT कडून देण्यात आली आहे.

NCERT ची पुस्तक तयार करण्याची प्रक्रिया

1. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) तयार करणे

NCERT पुस्तकांचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मुख्य आधार असतो . सध्याची पुस्तके NCF-SE 2023 आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार  तयार होत आहेत.  

NCF तयार करण्यासाठी आधी विषय समिती स्थापन केली जाते. २०२१ मध्ये 25 समित्या स्थापन झाल्या. या समित्या Position Papers तयार करतात, ज्यात पुस्तकांत काय बदल करावेत हे सांगितलेले असते. मग हे सर्व एका सुकाणू समितीकडे पाठवले जाते.  

2. टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटी (TDC)

प्रत्येक विषयासाठी Textbook Development Committee (TDC) बनवली जाते. यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असतात. काही उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञही यात समाविष्ट केले जातात जेणेकरून त्या विषयाच्या व्यावहारिक गरजा समजतात.  

3. मसुदा तयार करणे व अंतर्गत पुनरावलोकन

टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटीने मसुदा तयार केल्यानंतर तो NCERT अंतर्गत तज्ज्ञांकडे पाठवला जातो. ते तथ्यात्मक अचूकता, शैक्षणिक योग्यता आणि विद्यार्थी वयोमर्यादेनुसार योग्यता तपासतात. त्यानंतर तो अभ्यासक्रम समितीकडे जातो.  

4. शासकीय देखरेख

अधिकृतपणे शिक्षण मंत्रालय फक्त धोरणात्मक देखरेख करते आणि पाठ्यपुस्तकातील प्रकरणांना थेट मंजुरी देत नाही. पण अप्रत्यक्ष मॉनिटरिंग असते.

5. अंतिम मंजुरी व प्रकाशन

समाजाकडून सूचना किंवा महत्त्वाची प्रतिक्रिया आल्यास NCERT नव्या समित्या स्थापन करून मजकूराचे पुनरावलोकन केले जाते. बंदी घातलेल्या इयत्ता ८ च्या पुस्तकात 60 हून अधिक योगदानकर्ते  होते.

आणखी वाचा

India LPG Crisis : मोठी बातमी! घरगुती गॅस पुरवठ्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; तर नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांसाठी तीन कार्यकारी संचालकांची समिती गठीत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget