एक्स्प्लोर
Advertisement
आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी सायकल प्रवास, 15 वर्षीय ज्योतीचं इवांका ट्रम्पनंही केलं कौतुक
15 वर्षीय ज्योती कुमारीनं (Jyoti Kumari) आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला आहे. यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी दिल्ली: लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं सध्या खूप कौतुक होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केलं आहे. 15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला आहे. यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत ट्वीट करताना इवांकानं म्हटलं आहे, ''15 वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1,200 किमीचं अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं तिनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं लक्ष वेधलं आहे.
ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक सर्वत्र होत असून आता सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली आहे. ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचं ठरवलं आणि सात दिवसांत तिने 1200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं.
ज्योतीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी म्हटलंय की, ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावलं आहे. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचं असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसं पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे, असं ओंकार सिंह यांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement