Bihar Election 2025: मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
Bihar Election 2025: बिहार निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2025 कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन टप्प्यांत मतदान 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होईल तर मतमोजणी 16 नोव्हेंबर रोजी होईल.

Bihar Election 2025: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि मतदारयादी सुधारणा कार्यक्रमामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्चचिन्ह निर्माण केलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार निवडणूक कार्यक्रम (Bihar Assembly Election 2025 Schedule) घोषित केला. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होईल.
'त्यांना आयोग नवीन मतदार कार्ड जारी करेल' (Bihar Election Law and Order Measures)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "सत्य हे आहे की लोकांनी सोशल मीडियावर एसआयआरबद्दल खूप टिप्पण्या केल्या आहेत. परंतु सत्य हे आहे की राजकीय पक्षांनी एसआयआरची मागणी केली आहे. निवडणूक आयोग ज्या मतदारांचे पत्ते बदलले आहेत त्यांना नवीन मतदार कार्ड जारी करेल."
निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील (Bihar Voter List 2025 Correction SIR)
निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील. 30 सप्टेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल."
बिहारमध्ये किती पुरुष आणि महिला मतदार आहेत? (Bihar Election 2025 Voter Count)
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. निवडणुकीसाठी आम्ही बिहारच्या जनतेचे सहकार्य मागतो. बिहारमध्ये एकूण 7.42 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 3.92 कोटी पुरुष आहेत आणि 3.5 कोटी महिला आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 मतदार असतील."
मतदार यादी दुरुस्त करण्यात आली (Bihar Voter List 2025 Correction SIR)
बिहारच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी एसआयआरबाबत सांगितले की, "मतदार यादी दुरुस्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे. अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना वितरित करण्यात आली आहे. जर अजूनही काही समस्या असतील तर ते अर्ज करू शकतात."
2020 मध्ये बिहारमध्ये काय घडलं? (Bihar Election 2025 Political Analysis)
दुसरीकडे, 2020 मध्ये बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यापूर्वी 2015 मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले होते. 12 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निवडणुकीचे निकाल 8 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. बिहार विधानसभा निवडणूक 2020 ही भारतीय राजकारणात फार महत्वाची ठरली. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (राजद) तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रबळ आव्हान घेऊन उतरला. तर दुसरीकडे जनता दल (युनायटेड) चे नितीशकुमार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी महायुती करून निवडणूक लढवली. निकाल लागला तेव्हा राज्यातील जनतेने बदलाची लाट निर्माण केली असली, तरी अंतिम आकडेवारीत महायुतीने केवळ 15-20 जागांच्या फरकाने सत्ता काबीज केली.
नितीश यांनी भाजपसोबत राहून मुख्यमंत्रीपद टिकवले
या निवडणुकीतील खरा "किंगमेकर" ठरला तो छोट्या पक्षांचा आकडा. विशेषतः एआयएमआयएम (AIMIM) आणि चिराग पासवान यांच्या लोजपाने (LJP) निवडणुकीत थेट सत्ता काबीज केली नसली तरी राजकीय समीकरण ढवळून काढलं. चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधी भूमिका घेत भाजपच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाला फटका बसला, पण त्याचवेळी भाजपला फायदा झाला. परिणामी, महायुतीत भाजप हा मोठा पक्ष बनला आणि नितीशकुमार यांची ताकद कमी झाली. राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही (75+), सत्ता त्यांच्या हातून निसटली. यामध्येच नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय "कला" दाखवली. लोकांचा कडवा विरोध असूनही नितीश यांनी भाजपसोबत राहून मुख्यमंत्रीपद टिकवले. त्यांचा हा निर्णय राजदसाठी मोठा धक्का होता, कारण जनमताने त्यांना पहिली पसंती दिली होती, पण सत्ता समीकरणात आकड्यांचा खेळ महत्त्वाचा ठरला.
इतर महत्वाच्या बातम्या























