एक्स्प्लोर

Corona Vaccine | कोरोनावरील स्वदेशी लस 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता, भारत बायोटेकचा दावा

भारतात तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षणाला मान्यता देण्यात आली आहे.या लसीचे परिणाम समोर येण्यासाठी 2021 सालातील एप्रिल-मे उजाडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: भारतातील कोरोनावर तयार होणारी पहिली लस कोवॅस्किन ही किमान 60 टक्के प्रभावी असेल असा दावा ही लस तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. या कंपनीला भारतीय औषधे महानियंत्रक (DCGI) कडून गेल्या गुरुवारी तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.

स्वदेशी कोविड लस ही किमान 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षणाचे अंतिम निकाल पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय बायोटेक कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी याविषयी सांगितले की, "कोविड 19 वरील स्वदेशी लस ही किमान 60 टक्के प्रभावी असेल. आता आम्ही कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वात मोठ्या मानवी चाचणीचे परीक्षण करणार आहोत. याचे निकाल हे 2021 सालच्या एप्रिल किंवा मे महिन्यात येतील."

साई प्रसाद हे भारत बायोटेक कंपनीत उत्पादन विकास टीमचे सदस्य आहेत. त्यांनी सांगितले की कोरोनावरील अशा प्रकारची लस जर 50 टक्के जरी प्रभावी ठरली तरी त्याला जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेची फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन आणि भारताची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना मंजुरी देतात. स्वदेशी कोरोना लस संदर्भात आमचे लक्ष किमान 60 टक्के प्रभावी किंवा त्यापेक्षा जास्त असणे हे आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे.

भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु भारत बायोटेकने पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणाचे निकाल भारतीय औषधे महानियंत्रक (DCGI) समोर सादर केले आहेत. त्यावर कोणतीही मोठी शंका व्यक्त करण्यात आली नाही. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि आता या लसीचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची तपासणी होत आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते या लसीची मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्यास त्याचे खरे परिणाम समोर येतील.

साई प्रसाद यांनी सांगितले की, "या लसीचे वार्षिक 150 दशलक्ष डोस उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करण्याचा विचार भारत बायोटेक कंपनी करत आहे. या लसीच्या किंमतीवर अजून कोणतीही चर्चा झाली नाही." त्यांनी असेही सांगितले की "तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षणावर 150 करोड रुपये खर्च करण्यात येणार आहेत."

संबंधित बातम्या:

जाणून घ्या भारतात कोरोना विषाणूच्या लसीची किंमत किती असू शकते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget