BNP Recruitment 2021 : बँक प्रेस नोटमध्ये 135 विविध पदांची भरती, एक लाखांपर्यंत मिळेल वेतन
BNP Recruitment 2021 : बॅंक नोट प्रेसमध्ये वेलफेयर ऑफिसर, सुपरवायजर, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निशियन या पदांसाठी भरती निघाली आहे.
नवी दिल्ली : बॅंक नोट प्रेस, देवास या ठिकाणी वेलफेयर ऑफिसर, सुपरवायजर, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निशियन या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार बॅंक नोट प्रेसच्या अधिकृत वेबसाइट bnpdewas.spmcil.com वर भेट देऊ शकतात आणि त्या माध्यमातून अर्ज करु शकतात.
भरतीचे वेळापत्रक
-ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : 12 मे 2021
-ऑनलाइन अर्ज प्र्क्रियेची अंतिम तारीख : 11 जून 2021
-स्टेनोग्राफी टेस्ट अॅन्ड टायपिस्ट टेस्ट : जूलै-ऑगस्ट 2021
-ऑनलाइन परीक्षाची तारीख : जुलै-ऑगस्ट 2021
किती पदांची भरती आहे?
-एकूण पदे : 135
-वेलफेयर ऑफिसर : 01 पद
-सुपरवायझर : 02 पदे
-ज्युनिअर ऑफिसर असिस्टंट : 15 पदे
-ज्युनिअर टेक्निशियन : 113 पदे
भारत सरकार MINT नोएडा
-सेक्रेटेरियल असिस्टंट : 01 पद
-ज्यूनिअर ऑफिस असिस्टंट : 03 पदे
वेतन किती असेल?
-ज्युनिअर ऑफिस असिस्टंट - 21,540-77,160 रुपये
- ज्युनिअर टेक्निशियन - 18,780-67,390 रुपये
- सेक्रेटेरियल असिस्टंट - 23,910-85,570 रुपये
- वेलफेयर ऑफिसर - 29,740-1,03,000 रुपये
- सुपरवायजर - 27,600-95,910 रुपये
वयोमर्यादा किती आहे?
- ज्युनि्अर ऑफिस असिस्टंट - 28 वर्ष
- ज्युनिअर टेक्निशियन - 25 साल
- सेक्रेटेरियल असिस्टंट - 28 वर्ष
- वेलफेयर ऑफिसर - 30 वर्ष
- सुपरवाइजर - 30 वर्ष
उमेदवारांची निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, स्टेनोग्राफी टेस्ट आणि टायपिंग टेस्टच्या आधारे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Assam : हेमंत बिस्वा सरमा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, दुपारी 12 वाजता शपथविधी
- 18-44 वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्य, 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आम्ही पुरवठा करु; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
- Coronavirus in Mumbai : शाब्बास मुंबई! मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500हून कमी