एक्स्प्लोर

अयोध्या वाद : 3 मिनिटांचं कामकाज, सुनावणी 3 महिन्यांसाठी टळली

2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती.

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात राम मंदिराच्या निर्माणासाठी वाद सुरु असताना, आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावरील सुनावणी जानेवारी 2019 पर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या घटनापीठाने हे प्रकरण जानेवारी 2019 मध्ये वरिष्ठ घटनापीठासमोर आणण्यास सांगितलं. तसंच हेच घटनापीठ यावर सुनावणी करणार की नाही हे देखील निश्चित नाही. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आजच्या टिप्पणीनंतर स्पष्ट झालं की, नियमित सुनावणीची तारीख निश्चित होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन मिनिटांच्या कामकाजात अयोध्या प्रकरणाची सुनावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली.

आठ वर्षांपासून प्रलंबित आहे प्रकरण

30 सप्टेंबर 2010 ला या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. वादग्रस्त जागेवर मशिदीच्या आधी राम जन्मभूमी असल्याची बाब अलाहाबाद उच्च न्यायालयानं मान्य केली होती. मात्र जमिनीला रामलला विराजमान, निर्मोही अखाडा, आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात वाटण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. जमिनीची एक तृतीयांश जागा मुस्लीम गटाला दिली होती, तर तीन गटात ही जमीन विभागण्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयानंतर सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

राम मंदिर प्रकरणावर एक नजर

- अयोध्येत श्री रामाचा जन्म झाल्याची धारणा हिंदूंची आहे. - हिंदू पक्षाचा आरोप आहे की 16 व्या शतकात राम मंदिर तोडून बाबरी मस्जिद बांधण्यात आली. - ज्यावेळी मशिदीत श्री रामाची मूर्ती ठेवली तेव्हापासून म्हणजेच 1949 पासून हा वाद सुरु आहे. - 1980 च्या शेवटी आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातील भाजपने हा मुद्दा हाती घेतला. - 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget