एक्स्प्लोर
ठाण्यासह देशभरातून चार दहशतवादी, पाच संशयित ATS च्या ताब्यात

मुंबई : मुंबई, बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या पोलिसांच्या मदतीनं एटीएसनं ही कारवाई केली. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. नाजिम हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. मात्र 2014 पासून तो मुंब्य्राच्या देवरी पाडा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतलं. नाजिमचे घरमालक गावी गेल्यामुळे उत्तर प्रदेशातूनच आलेले गुलफाम आणि उजैफा 5 एप्रिलपासून त्याच्या घरी राहायला आले. ते दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नाजिमने शेजाऱ्यांना दिली होती. हे दहशतवादी घातपात घडवण्याचा कट रचत असून काही तरुणांचं ब्रेनवॉश करत असल्याची माहिती पाच राज्यांच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. https://twitter.com/ANINewsUP/status/854957962263121920 https://twitter.com/ANINewsUP/status/854958622517764096
आणखी वाचा























