एक्स्प्लोर
सर्वेक्षण : कर्नाटकात कमळ फुलणार?
कर्नाटक विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेसला सत्ता राखण्याचं, तर भाजपला काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्याचं आव्हान आहे. एकंदरीत दोन्ही पक्षांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
![सर्वेक्षण : कर्नाटकात कमळ फुलणार? As per Survey, BJP may win in Karnataka Assembly Election latest updates सर्वेक्षण : कर्नाटकात कमळ फुलणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/15200545/karnatak.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे जैन-लोकनिती-सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा जाहीर करणाऱ्या काँग्रेससोबत लिंगायत समाज नसल्याचे सर्वेक्षणातून दिसते आहे. कारण सर्वेक्षणानुसार अधिकाधिक लिंगायत समाज भाजपसोबत जात असल्याचे दिसते आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेसला सत्ता राखण्याचं, तर भाजपला काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्याचं आव्हान आहे. एकंदरीत दोन्ही पक्षांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
कर्नाटक निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार?
- भाजप – 89 ते 95
- काँग्रेस – 85 ते 91
- जेडीएस – 32-38
- इतर – 6 ते 12
- सिद्धरमय्या – 30 टक्के
- बी. एस. येडीयुरप्प – 25 टक्के
- एचडी कुमारस्वामी – 20 टक्के
- एकूण जागा 224
- बहुमताचा आकडा – 113
- भाजप (92) + जेडीएस (35) – 127
- एकूण जागा 224
- बहुमताचा आकडा – 113
- काँग्रेस (88) + जेडीएस (35) - 123
- नरेंद्र मोदी – 43 टक्के
- राहुल गांधी – 28 टक्के
- कर्नाटकात भाजप बहुमातापूसन 17 जागा दूर राहत असल्याचे या सर्वेक्षणावरुन दिसून येते आहे. बहुमातासाठी 113 जागांची आवश्यकता आहे.
- सर्वेक्षणानुसार काँग्रेसच्या हातून कर्नाटकची सत्ता जाऊ शकते, तर दुसरीकडे जेडीएसशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही.
- लिंगायत समाज कर्नाटकात भाजपसोबत असल्याचे सर्वेक्षणावरुन दिसून येते. 60 टक्के लिंगायत समाज भाजपसोबत, तर 23 टक्के लिंगायत समाज काँग्रेससोबत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.
- कर्नाटक निवडणुकीत भाजपला 35 टक्के, काँग्रेसला 37 टक्के, जेडीएसला 20 टक्के आणि इतर पक्षांना 8 टक्के मतं मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)