एक्स्प्लोर
‘जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजपने तीन वर्षात करुन दाखवलं’
'जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षात करुन दाखवलं,' असं म्हणत मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला.
![‘जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजपने तीन वर्षात करुन दाखवलं’ Arvind Kejriwal Says Bjp Benefactor Divides Hindus And Muslim ‘जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजपने तीन वर्षात करुन दाखवलं’](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/26210836/kejriwal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षात करुन दाखवलं,' असं म्हणत मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला.
आम आदमी पार्टीच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या रामलीला मैदानावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले की, "सध्या देश अतिशय नाजुक परिस्थितीत जात आहे. हिंदू-मुस्लीमांना एकमेकात भिडवून देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हिंदू-मुस्लीमांमध्येच वाद निर्माण करुन भारताचे दोन तुकडे करण्याचा पाकिस्तानचे प्रयत्न आणि स्वप्न आहे."
ते पुढे म्हणाले की, "जे लोक देशातील हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करुन, दोन भागात विभाजित करत आहेत, ते खऱ्या अर्थाने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे एजेंट आहेत. देशभक्तीची झुल पांघरुन हे देशद्रोही वावरत आहेत."
भाजपवर जोरदार हल्ला करताना केजरीवाल म्हणाले की, "देशाचे दोन तुकडे करण्याचे काम जे 70 वर्षात पाकिस्तानला जमलं नाही, तेच काम गेल्या तीन वर्षात भाजपने करुन दाखवलं आहे."
याशिवाय भ्रष्टाचारावरुनही केजरीवालांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसप्रमाणेच केंद्रातील भाजप सरकारचेही हात भ्रष्टाचाराच्या चिखलाने बरबटले आहेत. तसेच काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकालाही मुळापासून उखडून टाकलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, पक्षाअंतर्गत माजलेल्या बंडाळीवरुनही केजरीवालांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. देशाच्या हितासाठी पक्षातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)