एक्स्प्लोर

अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी असल्याचे सांगत, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून करतात

अकोला : भाजपाला महाराष्ट्रातील 48 पैकी सर्वाधिक जागा जिंकायच्या असून उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभा सदस्य असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी याठिकाणी जाहीर सभा घेत भाजपला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं. तर, गृहमंत्री अमित शाह यांनीही आज अकोल्यात सभा घेतली असून उद्या अमरावतीमध्ये त्यांची सभा होत आहे. अकोल्यातील आपल्या सभेतून अमित शाहांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याचंही ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी असल्याचे सांगत, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून करतात. आज, अमित शाह यांनीही शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देताना, जय भवानी-जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. अकोलावासीयांना या लोकसभा निवडणुकीत तुम्ही मोदींसोबत आहात का, मोदींना आशीर्वाद देणार का, तुम्ही कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबणार का?, असा सवाल अमित शाह यांनी विचारला. तसेच, अकोल्यात बटण दाबा, करंट इलटीत जाईल असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. तर, माझ्यासोबत दोन हात उंचावत जोरजोरात घोषणा द्या, भारत माता की ... जय... वंदे मातरम... वंदे मातरम... माझ्यासोबत शिवाजी महाराजांची घोषणा द्या. जय शिवाजी... जय भवानी... जय जय जय जय जय शिवाजी... जय जय जय जय जय भवानी.. अशी घोषणाबाजी अमित शाह यांनी अकोल्यातील सभेत करुन उपस्थितांची मने जिंकली. 

जय भवानी शब्दावरुन वाद

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरेच्या प्रचारगीतामधून जय भवानी हा शब्द काढण्याचे निवडणूक आयोगाने पक्षाला सांगितले आहे. मात्र, काहीही झाले तरी मी जय भवानी शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते. आता, अमित शाह यांनी जय भवानी, जय शिवाजीचा नारा दिल्याने पुन्हा एकदा जय भवानी चांगलंच चर्चेत आलं आहे.  

योगींची सभा रद्द, अमित शाह अकोल्यात

भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शाह यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा होत झाली. 21 एप्रिलची योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्यावर अमित शाहांना मैदानात उतरवत अकोल्यात प्रचारात मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शाहा यांच्यासह व्यासपीठावर उमेदवार अनुप धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार अमोल मिटकरी, विभागातील अनेक भाजप आमदारांसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते

विकसित भारतासाठी कावड यात्रा

अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो. आज हनुमान जयंती आहे. नुकतेच, थोड्या दिवसांपूर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. इंडी आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही. पण, पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घाटनही केलं, अमित शाह यांनी म्हटले. 70 वर्ष राम मंदिर अडकवून ठेवलं. राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं. पंतप्रधानांची देशभरात विकासाठी कावड यात्रा, विकसित भारतासाठी पंतप्रधानांची कावड यात्रा आहे, असेही अमित शाहांनी सांगितले.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget