एक्स्प्लोर
Advertisement
पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड
नवी दिल्ली: अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हल्ला हा 'लष्कर ए तोयबा' आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी संयुक्तपणे केल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणाने गृहमंत्रालयाला दिली आहे.
इतंकच नाही तर इस्माईल नावाच्या लष्कराच्या दहशतवाद्याच्या नेतृत्त्वात हा हल्ला झाला. यासाठी इस्माईलला दोन पाकिस्तानी दहशतवादी आणि दोन स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांची साथ होती, अशीही माहिती समोर आली आहे.
लष्कर ए तोयबाचा इस्माईल हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचीही बाब या रिपोर्टमध्ये उघड झाली आहे.
या दहशतवाद्यांना स्थानिक हिजबुलच्या दहशतवाद्यांनी वाहतुकीसाठी मदत केली. बसवर गोळीबार करुन ती बस ताब्यात घेण्याचा डाव दहशतवाद्यांचा होता.
तीन दिवसांचं राशन-पाणी
या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी पूर्ण तयारी केली होती. त्यांच्याकडे तीन दिवसांचं अन्न, खाद्यपदार्थ होते. अमरनाथ यात्रेकरुंच्या एकट्या बसला घेरण्याचा त्यांचा डाव होता. तो डाव त्यांनी सोमवारी रात्री साधला.
दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. तर इतर भाविक गुजरातमधील वलसाडचे आहेत.
रात्री सव्वा आठच्या सुमारास बालटाल इथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाऊन अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement