एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी दिल्लीत रात्रभर खलबतं
नवी दिल्ली : काश्मीरमधील उरीतल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत खलबतं सुरु झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत दिल्लीत चाललेल्या बैठकीला मोदी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वी उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर आजही चकमक झाली. ज्यात दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, तर 18 भारतीय जवान शहीद झाले. पण पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी मंत्रिमंडळानं खलबतं सुरु केली आहेत.
आंतराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताकडून प्रयत्न सुरु आहे. शिवाय सीमेवर होणारा दहशतवाद थांबवण्यासाठी करता येण्यासारख्या उपायांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासमवेत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी उपस्थित होते. बुधवारी पुन्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.
पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. देशभरातून पाकिस्तानला कडवं उत्तर द्यावं, अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
काय आहेत 5 निर्णय?
- भारतीय सेनेच्या बेसकॅम्पची सुरक्षा आता पॅरा कमांडो करणार आहेत. अगोदरपासूनच वायू सेनेच्या हवाई मार्गाची सुरक्षा ‘गरुड’ पॅरा कमांडो करतात तर नौसेनेसाठी ‘मारकोस’ कमांडो काम करतात.
- पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्यासाठी चर्चेत असणाऱ्या पाकिस्तानच्या ‘बॅट’ म्हणजेच बॉर्डर अॅक्शन टीमचा सामना करण्यासाठी भारतीय सेनेच्या ‘घातक’ बटालियनची नियुक्ती केली जाणार.
- एलओसी आणि सीमेच्या सुरक्षेसाठी जास्त सुरक्षाबळ तैनात करण्यात येणार.
- एलओसीच्या निगराणीसाठी सेना आता ड्रोनचा वापर करणार आहे. सध्या ड्रोनचा वापर काही भागांपर्यंतच मर्यादित आहे.
- उरीसारख्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सीमा ओलांडून येणाऱ्या आतंकवाद्यांच्या खात्म्यासाठी सेनेकडून ‘स्वच्छता अभियान’ सुरु करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement