एक्स्प्लोर
'आप' खासदार भगवंत मान यांचं लोकसभेतून निलंबन
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. मान यांनी स्वतःच्या घरापासून संसदेच्या आतपर्यंतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. संसदेची सुरक्षितता धोक्यात घातल्याच्या आरोपाअंतर्गत मान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी भगवंत मान यांची चौकशी होईल. 9 सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. समितीचा निर्णय येईपर्यंत भगवंत मान सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही, असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सांगितलं.
केवळ माफीने तोडगा निघणार नाही : महाजन
सुमित्रा मान यांनी भगवंत मान यांना समन्स जारी केला होता. त्यानंतर मान मला भेटली. ते माफी मागण्यास तयार आहे. पण माफी मागून तोडगा निघू शकत नाही. प्रकरण गंभीर आहे. त्यावर कोणती कारवाई करायची याबाबत मी सगळ्यांशी बोलत आहे. जर हे सभागृहाच्या आत घडत असेल तर तातडीने कारवाई व्हायलाच हवी. या मुद्द्यावर सर्वच खासदार नाराज आहेत, असं महाजन यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या : आप खासदाराकडून संसद परिसराचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
भगवंत मान काय म्हणाले? तर भगवंत मान म्हणाले की, "मी लोकसभा अध्यक्षांना भेटलो होतो. मला बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी असं मी त्यांना सांगितलं. संसदेची सुरक्षितता संकटात टाकण्याचा माझा हेतू नव्हता. मी लेखी माफी मागितली आहे. दारु पिऊन संसदेत? भगवंत मान यांच्यावर दाऊ पिऊन संसदेत येण्याचाही आरोप होत आहे. आम आदमी पक्षातून निलंबित खासदार हरिंदर खालसा यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. तसंच खालसा यांनी अध्यक्षांकडे आपली जागा बदलण्याचीही मागणी केली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement